साहित्य संमेलनात बरीचशी पुस्तकं मिळाली नाहीत. अगदी त्या त्या प्रकाशन संस्थेच्या स्टॉल्सवरही नाही. बरं तेव्हा उपलब्ध नव्हती आणि नंतर येणार असतील म्हटलं, तर ते ही नाही. पहिल्या दिवशीच दोन पुस्तकांच्या शेवटच्या प्रती मिळाल्या. जराशा खराब असतील, तरी घेण्यासारख्या होत्या. ’मुंबई दिनांक’ तर त्याही पलिकडे गेलं होतं. वर मॅजेस्टिकचा एक विक्रेता मी ’मुंबई दिनांक’ आहे का विचारताच मला मी ’माजी मुंबई’घ्यावी म्हणून मागे लागला. पुस्तक कशाबद्दल आहे हे ही त्याला माहित नव्हतं!!!!
राजहंसने ’बाराला दहा कमी’ चं मुद्रण करून खूप वर्षं झाली, हे तेच सांगतात. पॉप्युलरकडे ’बिढार’ नाही, मौजेकडे ’बखर एका राजाची’ नाही. बरं, पुन्हा कधी मिळेल याचेही त्यांच्याकडे उत्तर नाही. बरं, शेवटच्या दिवशी गेल्याने संमेलनातला साठा संपला असावा असंही नाही. :-( सवलत मूल्याबद्दल तर बोलायलाच नको. मौजेकडे १०% डिस्काऊंट उपकार केल्यासारखा मिळाला. कॉंटिनेंटलकडेही तीच गत. तेच पुस्तक मॅजेस्टिककडे घेतले तर त्याच पुस्तकांवर १५% डिस्काऊंट. चांगली पुस्तकं घ्यायची तर किंमतीकडे लक्ष देऊन भागत नाही हे जरी खरं असलं तरी एकदम पंधरावीस पुस्तकं घ्यायची तर नक्कीच त्यामुळे फरक पडू शकतो. त्यामुळे ग्रंथालीचा ४०% डिस्काऊंट जाम आवडला!!!
एका स्टॉलवर दुसर्या प्रकाशकाचा स्टॉल कुठे आहे म्हणून विचारले तर तेही कुणी सांगत नाही. मराठीला वाचक नाहीत म्हणून एकीकडे ओरड करायची आणि दुसरीकडे वाचकाला काय हवंय याची पत्रास ठेवायची नाही. आणि म्हणे साहित्य संमेलन!!!
Showing posts with label मराठी पुस्तक. Show all posts

Sunday, December 26, 2010
Friday, November 19, 2010
कणेकरी!!!
एके रात्री निद्रादेवी आमच्यावर अंमळ रूसली.. नि एका बेसावध क्षणी मी पुस्तकांचे कपाट उघडले.. नाहीतरी शनिवारची जंगी खरेदी खुणावत होतीच.. मोठं पुस्तक आख्खी रात्र खाईल म्हणून छोट्सं नि हलकंफुलकं पुस्तक निवडलं-- कणेकरांचं गोतावळा.. पुढे दोन-अडीच तासांत ते संपलं नि मी बाजूला ठेवलेलं झाडाझडती पुन्हा उचललं हे काय आता वेगळं सांगायला हवं?
कणेकर कोणे एके काळी सामनाच्या रविवारच्या पुरवणीतून शब्दचित्रं रेखाटायचे त्याचं हे संकलन. गोतावळा म्हणजे शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर जमणारे इरसाल लोक.. नि अर्थातच त्यांचं शब्द चित्रण. प्रस्तावनेतच कणेकर म्हणतात की ,"यावेळच्या लेखात हवी तशी हजामत नाही झाली" असे अभिप्राय त्यांना मिळाले.. आपण हजामत केल्यासारखी लोकांची खेचतो हे त्यांना स्वत:लाच आवडले नाही.. मग त्यांनी त्या लोकांना यावर खास छेडताच असे काही नाही, उलट आमची लोकप्रियताच वाढली असे सर्वांनी त्याना सांगितले, असे कणेकर म्हणतात!!!! त्यांच्या या गोतावळ्यात अविनाश खर्शीकर, नंदू जूकर, संजय मोने, बाळ ठाकरे, ओ. पी. सारखी सुमारे बावीसशे व्यक्तीचित्रे आहेत..
पुस्तक वाचायला जसं हवं होतं तसं हलकेफुलके आहे.. नि काही अपवाद वगळता , उदा. त्यांचा मावसभाऊ सुभाष, कर्णिक वकील, ते लेखातून हजामत करतात हे वाक्य अगदी पटले.. चारपानी लेखाची पहिली ३ पाने त्या व्यक्तीचित्राची वाट लावण्यात खर्ची पडतात.. नि राहिलेल्या जागेत कधी आणखी एखादा राहिलेला अनुभव आणि "मेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये" च्या चालीवर त्या माणसाबद्दल शेवटी कुठेतरी चांगलं लिहिलं आहे...
सांगायचंच झाले तर अविनाश खर्शीकर बद्दल, "काहीही फुकट मिळेल ते घेऊन ठेवणारा माणूस.. मग ते मित्राच्या गाडीतले प्लास्टीकचे फनेल का असेना", "अवीच्या घरात अन्न शिजत नाही","अविनाशची दोन्-तीन वर्षांनी एकदा होणारी पार्टी म्हणजे एका वड्याच्या बदल्यात आपल्याला त्याला किमान चाळीस चिकनची जेवणं खायला घालणं", "त्याला नाटकाला सेटस लागत नाहीत, लाइटिंग लागत नाही, प्रेक्षकही लागत नसावेत" इ. इ. ओ पी नय्यरच्या तिरसटपणाबद्दलही तेच.. एकूण काय, थोडक्यात 'हजामतच!!'
या हजामतीत एक प्रकरण त्यांनी स्वतःवरही खर्ची घातलंय. स्वतःलाही थोडेफार चिमटे काढले आहेत, पण इतरांच्या चिमट्यांच्या तुलनेत हे काहीच नाहीत. त्यांच्याच गोतावळ्यातल्यातले एक संपादक कणेकरांनी चित्रपट समीक्षकांवर(यांत कणेकरही होते) कणेकरी शैलीतल्या लेखावर काट मारताना, "आपणच आपल्याला मारलेली थोबाडीत आपल्याला लागत नाही" असे म्हणतात ते इथे अगदी पटले..
थोडक्यात काय?
अगदीच न वाचले तरी काही हुकल्याची खंत नाही.. वाचलं तरी वेळ अगदीच वाया गेला असेही नाही छापाचे पुस्तक!!!
टीपः सदर परिचय छोटा डॉन यांना समर्पित!!!!

Labels:
कणेकरी,
गोतावळा,
मराठी पुस्तक,
शिरिष कणेकर
Subscribe to:
Posts (Atom)