ऑफिसमधल्या बर्याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं. त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता. म्हणून पुन्हा एकदा नव्याने त्याचा 'माफीचा साक्षीदार' शोधत होते. तो मिळाला नाहीच, पण त्यानिमित्ताने दुसरेच सिनेमे डाऊनलोड झाले. 'बॉम्बे टॉकी' बद्दल काही माहिती नव्हतं, पण 'गुलाबी टॉकीज'च्या नावाशी साधर्म्य आणि नावावरून काहीतरी चांगलं असेल असं वाटून तोही डाऊनलोड केला.
पाहायला सुरूवात केली. सर्वात आधी नट-नट्यांची नावं आली. शशी-कपूर जेनीफर म्हणजे चांगलाच असेल पण कदाचित समांतर देखील असू शकेल असं वाटलं. जस-जशा पुढच्या पाट्या येत गेल्या तेव्हा मात्र ज्या कुणी ही संकल्पना मांडली असेल त्याला दाद द्यावीशी वाटली. सिनेमा तब्येतीत पाहायचाय हे तेव्हाच नक्की झालं. त्यामुळे तो निवांतपणे पाहीन. सध्या फक्त तुम्ही या टायटल्सचा आस्वाद घ्या.

हे वरच्या फोटोवरचे लाटांचे तुषार अगदी खतरनाक!

मला ही जागा काही ओळखता आली नाही. कदाचित इतकी रिकामी दिसत असल्याने असावी.

गेल्या आठवड्यालत्या लोकसत्तामध्ये टीव्ही कलाकारांना त्यांच्या मालिकेतल्या नावांनीच ओळखले जात असल्याने आणि एक संपली की लगेच दुसरी मालिका चालू करण्याच्या नादात वाहिन्या या अभिनेत्यांची नामावली गाळत असल्याचा लेख होता. मला वाटलं. की यांना निदान कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखलं तरी जातं. पण पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ यांसारखे लोक सर्वसामान्यपणे लोकांना माहितही होत नाहीत. अशा परिस्थितीत बॉम्बे टॉकीजची नामावली खरीच अभूतपूर्व (काही कॅरीकेचर्स पाहिलीयेत, पण बहुधा ती त्या-त्या त्ंत्र प्रकारातल्या लोकांची वाटतील अशी होती, त्यावरून हाच तो माणूस असं ओळखणं अवघड असावं.) म्हणायला हवी.
टीपः लेखातील सर्व छायाचित्रे व्हीएलसी प्लेअर मधील स्नॅपशॉट हा पर्याय वापरून काढलेली आहेत, आंतरजालावरून उतरवून घेतलेली नाहीत.)

No comments:
Post a Comment