Friday, May 14, 2010
बम बम भोले!!!
स्पॉयलर अॅलर्टः ज्यांना बम बम भोले नावाचे प्रकरण पाहायचे आहे त्यांनी ही पोस्ट वाचू नये.
लालबाग परळ पाहायला गेले होते. मध्यांतरात बम बम भोले चा ट्रेलर दाखवला.. प्रेरणासांगायची गरज नव्हतीच.. दाखवलेल्या त्या एक दोन दृश्यातच मूळ चित्रपटातले शेम टू शेम संवाद नि फ्रेम टू फ्रेम चित्रिकरण पाहून डोकं फिरलंच... आज परीक्षा नि त्यानंतरचं सगळं सबमिशनचं मेन मिशन संपल्यावर टीपी करायचा मूड आला.. नि म्हटलं, चला.... जाऊन त्या बमबम भोलेच्या नावाने शंख करून येऊ. जिथे गेले, त्या थेटरातला प्रोजेक्टर रूममधला माणूस पण अंमळ गंडला होता.. आयत्यावेळी त्याने अॅडमिशन ओपन चालू केला!!! भ्वॉ... हे काय? माझ्या प्लॅनचा पोपट?? स्क्रीन चुकली की क्काय?? तिकिटं बुक केली, तेव्हा तर आख्खं थेटरच रिकामं होतं.. शेवटी दोन शाळकरी पोरं आली होती... त्यांच्याकडे पाहून ती पण बम बम लाच आली असावीत असे वाटत होतं... तोवर त्या माणसाच्या लक्षात चूक आली असावी नि एकदाचे ते प्रकरण चालू झालं.... आता नीट शिनिमा पाहता यावा की नाही? पाट्या संपायचा अवकाश, की आलाच बिकांचा फोन!!!! (तेव्हा बिका चुकीच्या वेळी फोन करतात या टारझनच्या वाक्याची अंमळ आठवण झाली).
तर हे पहा.. सस्पेन्स बिस्पेन्स काय नाय.. ज्यांना माहित नाही, त्यांच्या माहिती साठी: बमबम भोले हा प्रियदर्शनचा चिल्ड्रेन ऑफ हेवनचा अतिशय व्यवस्थित रित्या केलेलाहिंदी अनुवादात्मक चित्रपट आहे... पण म्हणून प्रियदर्शन नि चिल्ड्रेन ऑफ हेवन ही दोन नांवे आहेत म्हणून लगेच पोरासोरांना दाखवायला घेऊन जाऊ नका.. का? याची कारणे पुढे येतीलच..!!!
पहिला शीन... मस्त टवटवीत भाज्या.. बाजारातील एक प्रसन्न सकाळ.. एक पोर्यारंगीबेरंगी फुगे विकत आहे. त्याला एक माणूस जवळ बोलावतो, त्याला एक टिफिन देतो, शंभराच्या नोटेचा एक तुकडा देतो.. नि राहिलेला तुकडा काम झाल्यावर देईन असेखुणावतो.. तो मुलगा एका गाडीत पोलिस अधिकारी बसलेला असतो, त्याच्याजवळजातो, तोच डबा देणारा माणूस रिमोट्चे बट्न दाबतो.... बाँबस्फोट होतो.. फुगे उडूनजातात्(स्फोटात वाचतात ब्वॉ.. आमच्या इथे विस्तव/आगीची नुसती धग लागली तरीफुगे फटकन फुटतात.. हे पेश्शल फुगे असावेत) नि पुढच्याच क्षणी रक्तमांसाचा चिखलपडतो..
असो.. तर मूळ चित्रपटात कथेचे नायक्-नायिका सतत स्वेटर घालतात नि ती मुलगीडोक्याला स्कार्फ बांधून असते.. म्हणून आपल्याकडे डिट्टो तसले कपडे घालायलाचहवेत म्हणून कथा थंड हवेच्या प्रदेशात-आसामातसदृश्य भागात घडते.. बाकी ती अगदीइथे धारावी/माहिमच्या झोपडपट्टीत घडली असती तरी चालली असती. मुलगा-पिनाकीनि त्याची बहिण-रिमझिम , त्यांचे बाबा अतुल कुलकर्णी, आई- एक कुणीतरी फुटकळरोल करणारी बंगाली बाई असते ती आहे.. ते दोघे चहाच्या मळ्यात काम करतात.. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची. चहाच्या मळ्यात मुकादमाने आईशी अतिप्रसंगआजकाल लहान मुलांना पण प्रतिकात्मक दाखवलेल्या गोष्टी कळतात. त्यामुळे त्यांच्या साठीच्या चित्रपटात इतके obvious करण्याची गरज नाही हे मझे मत.)केल्याने बाबा त्या माणसाला मारतात नि ओघानेच दोघांचीही नोकरी जाते. मुलांची आत्या तुलनेने सधन आहे.. पण तिच्या नवर्याचा मार्ग सचोटीचा नसावा म्हणून त्याच्याकडून मिळालेली नोकरी बाबा लाथाडतात.. तिथे झालेल्या संवादात पोलिसांवर ते बाहेरचे आहेत म्हणून आपल्याला समजून घेत नाही, सगळे बाहेरचे लुच्चे आहेत असा आरोप हा आसामात राहणारा बंगाली करतो.. असो.. चित्रपटात चुकुन कुठेतरी मूळ चित्रपटापेक्षा वेगळेपणा आहे.. त्यातल्याच या वरच्या घटना..
मग , भावाचे बाजारात जाणे, किराणामालाच्या दुकानात भाजीच्या शेजारी ठेवलेल्याबहिणीच्या चपला कचरेवाल्याने नेणे, त्या शोधताना मुलाकडून भाज्या सांडणे.. सगळंकसं अग्गदी तस्संच. कुठ्ठे म्हणून नांव ठेवायला जागा नाही.. अगदी तिकडे मौलवीमशिदीत वाटण्यासाठी खडीसाखर फोडायला देतात ना?? तर इथेही अगदी तसेच.. पुजारीही खडीसाखरच फोडायला देतात.. (तात्पर्य काय? धर्म बदलला, म्हणून प्रसादबदलत नाही...=)) ) नि मग एवढं अगदी खडीसाखरेपर्यंत जमवून आणल्यावर मगबाबांनी चहात घालायला साखर मागणे नि ही देवाची साखर खाऊ नये म्हणून मुलीलाउपदेश करायचे नाही असं कसं चालेल??? :D
मग त्याचे बहिणीला आईबाबांना सांगू नको म्हणून समजावणे, दोघांचा वह्यांवरचासंवाद्(तो पण शब्दशः स्वैर अनुवाद), तिने शाळेला त्याचे बूट घालून जाणं मान्य करणे, त्याबदल्यात त्याने तिला पेन्सिल देणे हे आहेच.. झालेच तर एकाची शाळा सकाळी निदुसर्याची दुपारी हे नसेल तर पुढे चित्रपट घडणार कसा? म्हणून हे ही ठेवून दिले. मगत्या पोरीला ते शूज मोठे होणे, तिला ते घालून नीट चालता न येणे, त्यांच्या शाळेत मुलींना उड्या मारायला लागणे, शूज न घातलेल्या मुलींना नेट उड्या मारता न येणॅ नि नंतर बहिणीने शूज घाण आहेत मला घालायला लाज वाटते असे म्हणे पर्यंत पर्यंत श्टोरी येते..
आणि हो.. एक राह्यलंच.. तिकडल्याप्रमाणे यांच्याही अंगणात पाण्याचा गोल (हो, गोलच) हौद आहे. फरक इतकाच, की तिथले पाणी स्वच्छ दिसते, नि त्यातले मासे पटावे इतके छोटे आहेत नि इथले पाणी अतिशय घाण नि मासे एखाद्या मत्स्यसंग्रहालयातून दहा दिवसाच्या बोलीवर आणलेल्या कळपासारखे मोठे नि संख्यने कैच्या कैच आहेत.. तर मग ते दोघे ते बूट त्या हौदाशी बसून धुतात.. (तेव्हा बुटांच्या वरचा आदिदास चा लोगो अगदी स्वच्छ दिसतो. पण याबद्दल कुणी काही बोलायचे नाही हां!!!) तेव्हा साबणाच्या फुग्यांचा डिट्टो कॉपी पेस्टेड प्रसंग पाहून तर या लोकांची कीव आली.. उठून जावे असे मनात आले.. पण त्याचाही कंटाळा आल्याने पुढे काय वाढून ठेवलंय पाहावं लागलं..
आता उगाच कुणी किती रे कॉपी माराल असे म्हणेल म्हणून दोघांच्याही शाळामिशनर्यांनी चालवलेल्या दाखवल्या आहेत. मुलाला शिकवायला नन्स आहेत. त्याच्याशाळेत एक मुलगा रोज उशीरा येतो नि कारण विचारले तर रोज बाबा काहीतरी वेगळे(नि विनोदी) काम सांगतात म्हणून त्याला उशीर होतो. आणि मध्येच कधीतरी प्रियदर्शनला आठवते की सुरूवातीला आपण बॉंबस्फोट केला होता की राव.. म्हणून मग बाबांचे ज्याच्याशी भांडण झालेले असते त्याचा कुणीतरी गोळ्या झाडून खून करतो नि बालंट बाबांवर येतं. मग यांची परिस्थिती आणखीच वाईट बनते.
मग पुन्हा बदल दाखवून दिग्दर्शक कंटाळतो नि मूळ प्रेरणे कडे येतो. मग तो एकदा तिचा बूट गटारीत पाडतात. पुढे काय होते हे माहित आहे म्हणून सांगत नाही. मग थोड्या वेळाने त्या बहिणीला तिचे हरवलेले सँडल्स एका मुलीच्या पायात दिसतात, ती तिच्या घरापर्यंत जाते, नंतर भावाला त्यांचे घर दाखवते. काय? पुढचे माहित आहे की त्या मुलीचे बाबा अंध असतात नि हातगाडीवर वस्तू विकत असतात??? बर्रं मग राह्यलं.. हे माहित आहे तर पुढे त्या मुलीला तिचे बाबा नवीन शूज आणतात नि ती जुन्या चपला फेकून देते, नि ते ऐकून नायिकेला खूप दु:ख होते हे पण सांगत नाय... [( मग कुणीतरी बाबांना माळीकाम करायला सुचवतं.(जरी सेम शेम असले तरी मी आता हे सांगणार हां.) तर इथे पण ते मोठ्मोठ्या बंगल्यातून माळीकाम करायला जातात. मग बेल दाबल्यावरचे मालकांचे नि यांचे संवादही तेचतेच. फरक इतकाच की, तिथे एककंटाळलेला मुलगा नि त्याचे आजोबा असतात, तर इथे एक मुलगी आणि तिची आजीआहे. आजी म्हणून सुलभा देशपांडेना पाहून खुदुखुदु हसायलाच आलं होतं. मग पैसेमिळतात पण सायकलला अपघात होऊन त्याचेही होत्याचे नव्हते होऊन जाते.
पुन्हा एकदा काहीतरी वेगळेपण दाखवायची प्रियदर्शनला खुमखुमी येते. आता त्यांचीआत्या घरी येऊन सांगते की तिच्या घरी किती सुबत्ता आहे, तिचा नवरा बाहेरच्यालोकांना काम मिळवून देतो, एवढाली मुले सुद्धा आठवड्याचे दोन्-तीनशे मिळवतात. मग हा मुलगा आतोबांकडे जाऊन म्हणतो की बाबा तुमचे काम करत नाहीत, मी करतो, मला पैसे द्या. हा माणूस नायकाला नोटेचा अर्धा तुकडा देऊन एक काम सांगतो, ते उल्फाअतिरेक्यांचे काहीतरी काम असते नि अशी दोनतीन कामे केल्यावर नोटेचा राहिलेला अर्धा भाग मिळेल म्हणून सांगतो. [म्हणे ,"रईस देशके गरीब इलाके में ऐसी फटी हुई नोटे चलती हय" =)) पुढच्या वेळेस सगळ्या नोटा नीट तपासून घेईन हो मी.. एखादी तिकडून आलेली असायची..] हा काम करतो नि येऊन पाहतो तर आतोंबाच्या घरी आतोबा विरूद्ध पोलिस असा गोळीबार सामना रंगलेला असतो. त्यात एकटा असल्याने आतोबा मरतो. पण त्याचे शव जरा अतिच जवळून नि अंगावरची पांदरी चादर अतिच लाललाल दाखवलेय.
बाकी मग स्पर्धा/प्रसंग वगैरे सगळे शेम शेम.. क्काही फरक नाही.. पण त्यात दर्शीलभौकाही पळताहेत असे काही वाटत नाही.. आता मूळ पिक्चरमध्ये दाखवलेय म्हणूनत्याला इकडेपण वर्गात पहिला नंबर दिलाय. पण बर्याच ठिकाणी तो चेहर्यावरून निर्बुद्ध ठोकळा वाटतो. उगाच मिचेमिचे डोळे करतो नाहीतर मोठेमोठे डोळे करून बघत असतो.. असो. तर इथे ती स्पर्धा आदिदासने आयोजित केली आहे त्यामुळे आदिदास आणि हॉर्लिक्सची बक्कळ जाहिरात करून झाल्यावर शर्यत संपते. तिसरा येण्याऐवजी पहिला येण्यामध्ये जी हार आहे, ती मूळ 'अली' ने फक्त डोळ्यांतून दाखवलीय. दर्शीलने मान खाली घालण्यावाचून दुसरे काहीच केलं नाहीय.. तो घरी येतो. बहिणीला त्याने शूजआणाले नाहीत हे कळतं, ती आत जाते. हा आपले फाटके शूज काढतो नि त्या गोल हौदात पाय सोडतो. पायावरच्या जखमा अंमळ जास्तच मोठ्या नि माशांबद्दल तर कायबोलायलाच नको. तोवर बाबांना एक चांगली (पक्षी: रू ३००० दरमहा) ची नोकरी मिळते. त्याचा अॅडव्हान्स ही मिळतो. नि दोन किलो तांदूळ घेण्याची ऐपत नसणारे बाबा दोन्ही मुलांसाठी 'आदिदास' चे शूज घेतात!!! (इथे मी अंमळ कप्पाळ बडवून घेतलं)
खरंतर, अलीच्या ठिकाणी दर्शील ही निवडच मुळी चुकीची आहे. पण त्या बापड्यालाकाय बोल लावणार? इथे दिग्दर्शकालाच क्लिअर नाही, की तो एरिया कुठला दाखवतोय. आसाम, उटी की आणखी काही??? संवाद बहुतेक मराठी माणसाने लिहिले आहेत. बर्याचदा मराठी शब्द आले आहेत. तिसर्या क्रमांकाचे तुला मिळणारे बूट तुझ्या मापाचे असतील यावर "मैं तुम्हारे माप के माँग लूंगा" अशा छापाचे संवाद आहेत.. अतुलकुलकर्णी तर सरळ मराठी बाणा दाखवत मराठीतून हिंदी बोलतो. त्याच्या इतरचित्रपटात हे मला कधीच जाणवलं नाही. इथे त्याचा पहिलाच डॉयलॉग-"कल्याणी"- यातच ते जाणवते.
या सगळ्यात सुसह्य गोष्ट ती एकच- बहिणीची भूमिका करणारी जिया. गोड दिसते, गोडहसते. तिच्या डोळ्यांतून छान भावना व्यक्त करते. छान छान लुटुलुटु पळते. तिथे अलीपुढे सगळे दुय्यम ठरतात, अगदी सारासुद्धा. इथे हीच जो काही थोडाफार आहे तो चित्रपट खाऊन टाकते.
थोडक्यात काय, पाहायचाच असेल, तर चिल्ड्रेन ऑफ हेवनची अगदी पारायणे करा.. पण....... :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
chhan lihil ahe keep it up
Post a Comment