Monday, May 17, 2010

खांदे दुखले...

मूळ गाणे :

भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी

हळदीसाठी आतुरलेले हळवे मन आणि कांती

आयुष्य हे कढईवरल्या चुलीवरचे कांदेपोहे!!!!

नाट्याच्या या बाजारातून विक्रेत्यांची दाटी
आणि म्हणे तो वरचा जुळवी शतजन्मांच्या गाठी
रोज नटावे, रोज सजावे दारूण आशा खोटी
पाने मिटूनी लाजाळू परि पुन्हा उघडण्यासाठी

दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहताना
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानीमनी नसताना
नकळत आपण हरवून जावे स्वतःस मग जपताना
आणि मग डोळे उघडावे ही दिवास्वप्ने पाहताना

भातुकलीच्या धुवुन अक्षता तांदूळ् केले ज्यांनी
आणि सजवला खोटा रूखवत भाड्याच्या भांड्यांनी
भविष्य आता रंगवण्याचा अट्टाहासही त्यांचा
हातावरच्या मेंदीवर ओतून लिंबांचे पाणी

-------------------------------------------------

अस्मादिकांची प्रतिभा:


थकलेल्या जीवावर ओझ्यांची लादणी

विसाव्यासाठी आतुरलेले सारे शरीर अन् कांती

आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...१

आठवड्यांच्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी

आणि म्हणुनी "हे घ्या ताई" लागतात ते पाठी

आता संपेल, झाला शेवट, वेडी आशा खोटी

तोवर पाह्ती आणखी दुकाने, या पुन्हा उचकण्यासाठी

आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...२


व्हावी खरेदी॥ चुटकीसरशी!!! अशी स्वप्ने पाहताना

हळूच ठरतो प्लॅन यांचा मला न विचारता

आपसूक होते माझी आठवण प्लॅनिंग करता यांना

आणि मग येतो हाती भारा दिवास्वप्न भंगवणारा

आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...३

भाऊ असता हमाल कशाला हीच भावना यांची

आणि चढवले झाडावर मज गोड बोलून यांनी

खरेदीवर खरेदी करण्याचा झटपट सपाटा यांचा

माझ्या सगळ्या हरकतींवर ओतून घडाभर पाणी

आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...४

प्रेरणा(ज्यांना कळाली नसेल त्यांच्यासाठी):

सनई चौघड्यांमधले कांदे पोहे!!

भाऊ आम्हा बहिणींबरोबर खरेदीला यायला नेहमी नाखूष असतो!! काल बर्‍याच दिवसांनी आम्हा तिघी बहिणींनी त्याचा पुन्हा एकदा बकरा केला... तेव्हा सुचलेलं हे विडंबन!!!! पहिलाच प्रयत्न आहे... त्यामुळे अर्थातच मात्रा वगैरे गोष्टींना योग्य जागी मारण्यात आले आहे!!!

No comments: