साहित्य संमेलनात बरीचशी पुस्तकं मिळाली नाहीत. अगदी त्या त्या प्रकाशन संस्थेच्या स्टॉल्सवरही नाही. बरं तेव्हा उपलब्ध नव्हती आणि नंतर येणार असतील म्हटलं, तर ते ही नाही. पहिल्या दिवशीच दोन पुस्तकांच्या शेवटच्या प्रती मिळाल्या. जराशा खराब असतील, तरी घेण्यासारख्या होत्या. ’मुंबई दिनांक’ तर त्याही पलिकडे गेलं होतं. वर मॅजेस्टिकचा एक विक्रेता मी ’मुंबई दिनांक’ आहे का विचारताच मला मी ’माजी मुंबई’घ्यावी म्हणून मागे लागला. पुस्तक कशाबद्दल आहे हे ही त्याला माहित नव्हतं!!!!
राजहंसने ’बाराला दहा कमी’ चं मुद्रण करून खूप वर्षं झाली, हे तेच सांगतात. पॉप्युलरकडे ’बिढार’ नाही, मौजेकडे ’बखर एका राजाची’ नाही. बरं, पुन्हा कधी मिळेल याचेही त्यांच्याकडे उत्तर नाही. बरं, शेवटच्या दिवशी गेल्याने संमेलनातला साठा संपला असावा असंही नाही. :-( सवलत मूल्याबद्दल तर बोलायलाच नको. मौजेकडे १०% डिस्काऊंट उपकार केल्यासारखा मिळाला. कॉंटिनेंटलकडेही तीच गत. तेच पुस्तक मॅजेस्टिककडे घेतले तर त्याच पुस्तकांवर १५% डिस्काऊंट. चांगली पुस्तकं घ्यायची तर किंमतीकडे लक्ष देऊन भागत नाही हे जरी खरं असलं तरी एकदम पंधरावीस पुस्तकं घ्यायची तर नक्कीच त्यामुळे फरक पडू शकतो. त्यामुळे ग्रंथालीचा ४०% डिस्काऊंट जाम आवडला!!!
एका स्टॉलवर दुसर्या प्रकाशकाचा स्टॉल कुठे आहे म्हणून विचारले तर तेही कुणी सांगत नाही. मराठीला वाचक नाहीत म्हणून एकीकडे ओरड करायची आणि दुसरीकडे वाचकाला काय हवंय याची पत्रास ठेवायची नाही. आणि म्हणे साहित्य संमेलन!!!
1 comment:
u r right...
i had to spend 5 hrs searching for Kajalmaya...
At last i got it! huh!!
Post a Comment